कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज गोवा दौर्‍यावर

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आज गोवा दौर्‍यावर

गोवा - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राहुल गांधी आज शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी गोवा दौर्‍यावर येत आहेत. राहुल गांधी प्रदेश कॉंग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बैठक घेणार आहेत.
यावेळी ते सक्रिय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येत्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याशिवाय ते पणजी येथे खाण अवलंबितांचीही भेट घेणार आहेत. कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव हे सध्या गोव्यात आले आहेत. येत्या काही महिन्यात गोव्याची विधानसभा निवडणूक होणार आहे त्यानमित्ताने विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते गोवा दौर्‍यावर येत आहेत.