राज्यातील किराणा दुकानांच्या वेळेत होणार कपात -आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राज्यातील किराणा दुकानांच्या वेळेत होणार कपात -आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी कडक होऊ शकतो. किराणा माल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना वरील माहिती दिली. 

येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल जिल्हाधिकारी स्तरावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. 

किराणा दुकान दिवसभर उघडं राहतं. त्यामुळे किराणा दुकानाच्या नावाने अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यासाठी अजित पवार यांनी सकाळी 7 ते 11 असे चार तास किराण्यासाठी ठेवूयात, असं सांगितलं. कारण दिवसभर किराण्याच्या नावाखाली बाहेर पडणं योग्य नाही. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक तत्परतेने काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे टोपे यांनी सांगितले. 

ऑक्सिजन हा महत्त्वाचा विषय आहे. आपण स्वत:चं साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत आहोत. पण त्याचबरोबर 300 मेट्रिक टन आपण बाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून आणतोय. त्यामुळे 1550 टन ऑक्सिजन दररोज महाराष्ट्रात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागेल. ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कलेक्टरने त्वरित निर्णय घ्यावा याबाबतही चर्चा झाली. 

बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शनवर चर्चा झाली. येत्या चार-पाच दिवसांनी सर्वच सात उत्पादन कंपन्यांना केंद्र सरकारने नवीन ठिकाणी प्लांट लावण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल. महाराष्ट्रात ज्या फार्मा कंपन्या आहेत, त्यांनी उत्पादन करु शकतो अशी आशा व्यक्त केली.  तर ज्या सात कंपन्यांना परवानगी आहे त्यांच्या परवान्यावर प्लांट टाकता येईल अशाही स्वरुपाचे निर्णय घेण्यात आले. ज्या कंपनी पुढे येतील त्यांना संधी देऊ, असं एफडीएकडून सांगण्यात आलं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.