धाराशिव साखर कारखाना करणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

धाराशिव साखर कारखाना करणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट !

उस्मानाबाद, (प्रबोधन न्यूज) - साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. हा निर्णय वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या झुम मिटींगमध्ये घेण्यात आला,अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख शरद पवारांच्या आदेशानंतर या कारखान्याकडून पहिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

धाराशिव साखर कारखाना हा ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट राबवणारा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष मंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने २३ एप्रिल रोजी झूम मिटींग द्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली.त्यामध्ये धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील सहभागी झाले होते.

इथेनॉल प्रकल्पात फेरबदल करुन ऑक्सिजन निर्मिती शक्य
सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे. बैठकीत व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी पटवून सांगितले आणि या मिटींगमध्ये तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार
धाराशिव साखर कारखाना प्रति दिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणारी परवानगी मंत्री जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास उस्मानाबाद जिल्ह्याला ऑक्सिजन बाबतीत दिलासा मिळणार असून ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे.