शिरगावात दारुभट्टीवर छापा घालून 21 लाखांची हातभट्टी नष्ट ! पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई 

शिरगावात दारुभट्टीवर छापा घालून 21 लाखांची हातभट्टी नष्ट ! पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुरुवारी (दि. 15) कारवाई करून पोलिसांनी 21 लाख 6 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने ही धडक कारवाई केली. 

याप्रकरणी दोन महिला व एक अनोळखी पुरुष यांच्या विरोधात शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ( क ) (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली की, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर गावठी दारूची हातभट्टी लावून दारू तयार करून विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दारू भट्टीवर छापा मारला. त्यात पोलिसांनी 21 लाख रुपयांचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन आणि सहा हजारांचे लाकडी सरपण असा एकूण 21 लाख सहा हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, अनिल महाजन, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, जालींदर गारे, सोनाली माने यांनी केली आहे. पुढील तपास शिरगाव परंदवडी पोलीस करीत आहेत.