कोरोनाबाधितांमध्ये घट सुरूच

कोरोनाबाधितांमध्ये घट सुरूच


नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काल (शनिवारी) 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या एक लाख 72 हजार 594 वर पोहोचली आहे. तर यापैकी एक लाख 74 हजार 594 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे तीन कोटी 35 लाख 48 हजार 605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शनिवारी) 1701 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 01 हजार 551 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (शनिवारी) दिवसभरात 77 लाख 40 हजार 676 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत 102 कोटी 10 लाख 43 हजार लोकांना लसी देण्यात आली आहे.  राज्यात सध्या 24 हजार 022 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,95,063 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 17, 62 ,963 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.