ट्रूकॉलरने कोविड हॉस्पिटल डिक्शनरी लॉन्च केली ! आता कोविड हॉस्पिटल्सचा फोन नंबर शोधणे झाले सोपे !

ट्रूकॉलरने कोविड हॉस्पिटल डिक्शनरी लॉन्च केली ! आता कोविड हॉस्पिटल्सचा फोन नंबर शोधणे झाले सोपे !

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - भारतातील कोरोना संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता ट्रूकॉलरने कोविड हॉस्पिटल डिक्शनरी सुरू केली आहे. कोविड हॉस्पिटलचा दूरध्वनी क्रमांक व पत्त्याची माहिती भारतीय वापरकर्त्यांना या निर्देशिकेतून मिळणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी, आपल्याला स्वतंत्र अ‍ॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता नाही. वापरकर्ते ट्रूकॉलरअ‍ॅपच्या मेनूवर जाऊन थेट निर्देशिकेतून माहिती मिळवू शकतात.

या नवीन सेवेबद्दल ट्रूकॉलरकडून सांगण्यात आले आहे की,  या कोविड निर्देशिकेत देशभरातील अनेक राज्यातील कोविड रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते दिले आहेत आणि कंपनीने ती सरकारी डेटाबेसमधून घेतली आहे. तथापि, या निर्देशिकेत, वापरकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडच्या उपलब्धतेबद्दल आत्ताच माहिती मिळणार नाही. ट्रूकॉलर इंडियाचे एमडी इशीत झुंझुनवाला यांनी या नव्या सेवेबद्दल सांगितले की या माध्यमातून आपणास कोविड हॉस्पिटलचा फोन नंबर आणि पत्ता सहज मिळतील. आम्ही या निर्देशिकेवर काम करीत आहोत आणि लवकरच यात इतर कोविड हॉस्पिटलचा क्रमांकही समाविष्ट होईल.