अनिल देशमुख यांच्या घरावरील धाडसत्र पूर्ण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अनिल देशमुख यांच्या घरावरील धाडसत्र पूर्ण

तब्बल १२ तासांहून अधिक काळ चौकशी

नागपूर (प्रबोधन न्यूज) - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची सीबीआयने शनिवारी (दि. २४) दिवसभर झाडाझडती घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास हे धाडसत्र पूर्ण झाले.

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

 परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह प्रकरणातील संबंधित इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांच्या घर व कार्यालयांसह १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

 देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्याचीही सीबीआयने झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरा सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आणि पहाटे हे पथक निघून गेल्याचं समजते. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं वृत्त असून, इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले आहेत. सीबीआयकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. देशमुख यांच्या नागपूरातील निवासस्थानीही सीबीआयने छापा टाकला होता सायंकाळी सातच्या सुमारास सीबीआयची टीम देशमुख यांच्या बंगल्यातून बाहेर पडली.