कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्री शिंदेना टोला

कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्री  शिंदेना टोला

           मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -     मराठा आरक्षणाचा मुद्दा अजही चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारमार्फत मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशात निजामकालीन नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यांच्या या घोषणेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टोला लगावला आहे.

"कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल. अशा शब्दांत माजी ग्रामविकास मंत्री तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असे मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या जल्लोषात भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातल्या सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले.