नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार

नवाब मलिकांसारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार

पुणे -

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांच्यासारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झालेत. चंद्रकांत पाटील यांनी वापरलेली भाषा माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचण्यातही नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. त्या पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात गुंडाच्या पत्नीकडून चंद्रकांत पाटील यांचा सत्कार झाल्याच्या घटनेवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “राज्यातील एक वरीष्ठ नेते असे म्हणाले होते. त्यांचं मला एक भाषण आठवतं आहे. साम, दाम, दंड आणि भेद म्हणजे आम्ही काहीही करून कुणालाही विकत घेऊ. त्यामुळे ही तत्त्वाची लढाई नाही, तर फक्त सत्तेची लढाई आहे. त्यामुळे हे एक दुर्दैव आहे. अटलजींच्या काळामध्ये भाजप हा खूप जबाबदार पक्ष होता. त्यावेळी नागरिक अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते. आज आम्हाला एरवी तत्त्वज्ञान सांगत आहेत आणि तेच आज गुंडांसोबत दिसत असतील, तर ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना त्यांच्यासारखे नेते माझ्या खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झालेत. चंद्रकांत पाटील यांनी वापरलेली भाषा माझ्या तरी ऐकण्यात किंवा वाचण्यातही नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. त्या पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात गुंडाच्या पत्नीकडून चंद्रकांत पाटील यांचा सत्कार झाल्याच्या घटनेवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, राज्यातील एक वरीष्ठ नेते असे म्हणाले होते. त्यांचं मला एक भाषण आठवतं आहे. साम, दाम, दंड आणि भेद म्हणजे आम्ही काहीही करून कुणालाही विकत घेऊ. त्यामुळे ही तत्त्वाची लढाई नाही, तर फक्त सत्तेची लढाई आहे. त्यामुळे हे एक दुर्दैव आहे. अटलजींच्या काळामध्ये भाजप हा खूप जबाबदार पक्ष होता. त्यावेळी नागरिक अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते. आज आम्हाला एरवी तत्त्वज्ञान सांगत आहेत आणि तेच आज गुंडांसोबत दिसत असतील, तर ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल.