उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

मुंबई -
स्वत:च ट्विट करून दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकरने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले की तिला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या तिने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
उर्मिला मातोंडकरने ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, "मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. उर्मिला मातोंडरने हे ट्विट करताच तिचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.