साऊथ गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

साऊथ गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

पणजी, (प्रबोधन न्यूज) - गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. यापूर्वी नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्याअभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला मोठी गळती लागली आहे. परिसरात पांढरा धुर पाहायला मिळतोय. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. 

साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.