स्पा सेंटरमध्ये वेश्‍या व्यवसाय; दोघांना अटक, तरुणीची सुटका 

स्पा सेंटरमध्ये वेश्‍या व्यवसाय; दोघांना अटक, तरुणीची सुटका 


पिंपरी - स्पा सेंटरमध्ये वेश्‍या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. तसेच एका तरुणीची सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 20) सायंकाळी सव्वासहा वाजता व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी येथील थाय स्पा येथे करण्यात आली. 
गणेश शिवा उपाध्याय (वय 26, रा. हिंजवडी), श्रीकांत दत्तात्रय भालके (वय 28, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
आरोपींनी थाय स्पा या सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय चालवला. त्यासाठी त्यांनी एका तरुणीकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. दोघांना अटक करून एका तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे.