१ मे पासून लसीकरणासाठी आम्ही सज्ज ! महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार ? अजित पवार म्हणाले.. 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

१ मे पासून लसीकरणासाठी आम्ही सज्ज ! महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार ? अजित पवार म्हणाले.. 
पुणे, (प्रबोधन न्यूज) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. मात्र याविषयी मुख्यमंत्रीच ठामपणे सांगू शकतील, असे म्हणत कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. 

अजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. इतके दिवस आपल्या राज्याची जी गरज होती, ती भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशीही चर्चा केली. ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी दिली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी दिली. भरलेले टँकर रेल्वे, बाय रोड सेवेने येतील.'

'पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार करता डिस्चार्जची संख्या वाढत आहे. बरेच पेशंट रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेतोय. 18 ते 44 वयामध्ये लसीसाठी केंद्र राज्यांवर जबाबदारी देत आहे. आम्ही 5 जणांची कमिटी बनवत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,' असंही अजित पवार यांनी सांगितलं. 

ग्लोबल टेंडरविषयी बोलताना ते म्हणाले की, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो, ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख ग्लोबल टेंडरमध्ये असेल.

ऑक्सिजनबाबत जे बंद पडलेले प्लांट आहेत, ते सुरु करत आहोत. काही विजेअभावी बंद होते, काही आर्थिक कारणांनी बंद होते. ते सुरु करत आहोत. पवारसाहेबांनी सूचना केली आहे, साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

गडकरींशी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत झालेल्या चर्चेविषयी पवार म्हणाले की, विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याची जबबाब्दारी गडकरींनी घेतली आहे. असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही. केंद्राकडून ऑक्सिजन येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर केंद्राचं नियोजन आहे, अशीही माहिती अजित पवारांनी दिली.