विदारक ! नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू ! मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विदारक ! नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू ! मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर 

नाशिक, (प्रबोधन न्यूज) - राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे, या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली. 

काय झालं नेमकं ?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

दीड तासांनी गळती थांबली 

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. सध्या तरी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला आहे, अशी माहिती नाशिकचे  महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

या दुर्दैवी घटनेचे कुणी राजकारण करू नये - मुख्यमंत्री

'एका एका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.