महापालिकेने ९७९ करोनाबाधितांचे मृत्यू लपविले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापालिकेने ९७९ करोनाबाधितांचे मृत्यू लपविले

स्मशाभूमीतील आकडेवारीवरून प्रकार उघडकीस

स्मशानात प्रोटोकॉलनुसार अंत्यविधी, मात्र नोंदच नाही; सीमा सावळे यांचा आरोप

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. करोनामुळे दगावणाऱ्या रुग्णाच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महापालिकेच्या वतीने शहर हद्दीतील व शहरा बाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली जाते. मयत होणाऱ्या बाधितांची आकडेवारी लपविण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड महपालिकेच्या प्रशासनाने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्मशानभूमीमध्ये करोनाबाधितांचा अंत्यविधी करोना नियमानुसार करण्यात आला. मात्र त्याची नोंदच केली नसून तब्बल ९७९ मृत्यू लपविल्याचा धक्कादायक आरोप भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. याबाबत पत्र लिूहून त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना जाब विचारला आहे.

शहरातील १ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील एकूण मयत रुग्णांची संख्या २०१८ व शहराबाहेरील ८३९ इतकी जाहीर करण्यात आली. दोन्ही मिळून एकूण २ हजार ८५१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच १ एप्रिल रोजी एकूण १७ रुग्ण मयत झाल्याचे पालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. तर २३ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील एकूण मयत रुग्णांची संख्या २५५१ व शहराबाहेरील ११४१ इतकी जाहीर करण्यात आली. असे एकूण ३६९२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच २३ एप्रिलला एकूण ७१ रुग्ण मयत झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात एप्रिल महिन्यात १ ते २३ तारखे दरम्यान महापालिकेच्या वतीने करोनामुळे मृत झालेल्या ७४३ जणांवर भाटनगर (लिंकरोड, पिंपरी) येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याखालोखाल भोसरी स्मशानभूमीत ६०१, निगडी स्मशानभूमीत ३५८ आणि सांगवी स्मशानभूमीत ११८ असे एकूण १८२० करोनामुळे मृत झोलल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील आणि बाहेरगावच्या सर्व मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार हे अंत्यंसंस्कार झाले.

स्मशानातील रजिस्टर वहित करोना मृतांपुढे तसा शेरा असतो. त्याची पडताळणी केली असता चारही प्रमुख स्मशानांतून १८२० मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मृत करोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार १ ते २३ एप्रिल या कालावधीत एकूण ८४१ (३६९२-२८५१) करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले परंतु प्रत्यक्षात १८२० मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. म्हणजेच तब्बल ९७९ रुग्णांचा करोना मुळे मृत्यू होऊन मृतदेहांवर कोविड प्रोटोकॅालनुसार अंत्यसंस्कार झाला असतानाही सदर मयतांची नोंद लपविण्यात आल्याचे सावळे यांनी म्हटले आहे.

आकडेवारी लपवून करोना जाणार नाही

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होत असलेले मृत्यू नागरिकांसमोर सत्यतेने मांडल्यास या विषाणूची भीषणता लोकांच्या लक्षात येईल. परंतु मृतांची आकडेवारीची लपवालपवी केल्याने आरोग्य यंत्रणेमार्फत सुरु असलेल्या प्रयत्नांना गालबोट लागले आहे. अशाप्रकारे मृतांची आकडेवारी लपवून करोना जाणार नाही. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे मृतांची संख्या लपविण्याचे कारण काय हे आयुक्तांनी स्पष्ट करावे.

सीमा सावळे, नगरसेविका.