मोशीत ऑनलाईन संकेतस्थळावरील कार विकण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक ; 73 हजारांचा घातला गंडा 

मोशीत ऑनलाईन संकेतस्थळावरील कार विकण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक ; 73 हजारांचा घातला गंडा 

मोशी, (प्रबोधन न्यूज) -  येथील एका तरुणीची ऑनलाईन संकेतस्थळावर कार विक्रीची जाहिरात दिलेल्या अनोळखी व्यक्तीने 73 हजार 347 रुपये घेऊन कार न देता फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) बारणेवस्ती, मोशी येथे घडली.

काजल शब्बीर मुलानी (वय 24, रा. बारणेवस्ती, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, www.quikr.com या संकेतस्थळावर एका अनोळखी व्यक्तीने कार विकण्याची जाहिरात दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना संपर्क साधून फोन पे द्वारे टप्प्याटप्प्याने पैसे पाठवण्यास सांगून फिर्यादी यांची 73 हजार 347 रुपयांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.