मामाच्या गावाला जाणे पडले महागात ! तरुणीच्या सव्वा लाखांच्या राणी हारावर चोरटयांनी मारला डल्ला !

मामाच्या गावाला जाणे पडले महागात ! तरुणीच्या सव्वा लाखांच्या राणी हारावर चोरटयांनी मारला डल्ला !

पुणे, (प्रबोधन न्यूज) -एरवी मामाच्या गावाला जाणे म्हणजे भाचेमंडळींसाठी एक पर्वणीच असते, मात्र एका तरुणीला तिच्या मामाच्या गावी जाणं खूप महागात पडलं आहे. मामाच्या गावाला आलेल्या या तरुणीचा तब्बल सव्वालाख रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी मामाच्या घरातून चोरून नेला. ही घटना 6 एप्रिल रोजी दुपारी खेड तालुक्यातील आडगाव येथे उघडकीस आली. याबाबत 15 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्या प्रभाकर महाडिक (वय 21, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिव्या त्यांच्या मामा श्रीधर लक्ष्मण गोपाळे यांच्या घरी खेड तालुक्यातील आडगाव येथे आल्या होत्या. 5 एप्रिल रोजी रात्री साडेआठ ते 6 एप्रिल रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या कालावधीत त्यांचा साडेतीन तोळे वजनाचा एक लाख 20 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार त्यांनी घरातील कपाटात ठेवला होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातून फिर्यादी यांचा राणीहार चोरून नेला. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.