भारीच की ! 'या' बॉलिवूड स्टार्सकडे आहेत त्यांचे प्रायव्हेट जेट !

भारीच की ! 'या' बॉलिवूड स्टार्सकडे आहेत त्यांचे प्रायव्हेट जेट !
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - बॉलिवूड स्टार्स त्यांचे शाही जीवन जगण्यासाठी ओळखले जातात. लक्झरी बंगल्यापासून ते लक्झरी कारपर्यंतच्या गोष्टी तर सामान्य आहेत. बहुतांश स्टार्सकडे आलिशान गाड्यांचा ताफा दिसतो. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील काही ताऱ्यांना स्वतःच्या खासगी विमानाने प्रवास करण्यास आवडते. चला तर, पाहुयात कोणकोणत्या बॉलिवूड स्टारकडे खासगी जेट आहेत. 

१. प्रियांका चोप्रा 
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावणाऱ्या प्रियंका चोप्राचे खासगी जेट आहे. प्रियंका बर्‍याचदा अमेरिका आणि भारत दौर्‍यावर असते. अशा परिस्थितीत वेळ वाया जाऊ नये, म्हणून ती खासगी जेट वापरते. स्वतःचा जेट असल्याने कमी वेळात ती कुठेही जाऊ- येऊ शकते. 

२. अमिताभ बच्चन 
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडेही खासगी जेट आहे. त्यांनी या जेटमधील स्वतःची तसेच कुटुंबीयांची अनेक छायाचित्रे सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. बच्चन कुटुंब परदेशात सुट्टीसाठी जाताना ते स्वतःचा खासगी जेट वापरतात.

३. अक्षय कुमार 
एका वर्षामध्ये चार ते पाच चित्रपट करणारे अक्षय कुमार इतका बिझी असतो की तो आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू शकत नाही. त्यामुळेच जसा वेळ मिळेल तसा अक्षय आपल्या परिवारासह स्वतःचा खासगी जेट घेऊन परदेशात सुट्टीला जातो.  तसेच आपल्या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान तोदेखील तो जेटचा वापर करतो. 

४. अजय देवगण 
लक्झरी गाड्यांचा शौक असलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी अजय देवगण एक आहे. त्याच्या आलिशान वाहनांच्या संग्रहात मासेराती, बीएमडब्ल्यू झेड 4 आणि ऑडी ए 5 स्पोर्टबॅक आदींचा समावेश आहे. अजयकडे स्वतःचा खासगी जेट आहे. रिपोर्टनुसार अजयकडे एयरक्राप्ट सिक्स सीटर हॉकर 800आहे. 

५. शाहरुख खान 
२०१६ मध्ये शाहरुख खानने मुलाखतीत गमतीने म्हटले होते की, मला विमान खरेदी करायचा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत.  वास्तविक किंग खानकडे स्वतःचा  खासगी जेट देखील आहे जे त्याच्या राजेशाही लाइफस्टाइलचे दर्शन घडवते. 

६. शिल्पा शेट्टी-कुंद्रा 
शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे राजेशाही जीवन जगतात. जगातील बर्‍याच भागात त्यांची मालमत्ता आहे आणि त्यांचे स्वतःचे खासगी जेट देखील आहे.