पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय करणार : अजित पवार

पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय करणार : अजित पवार

पुणे, (प्रबोधन न्यूज) - लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. लहान मुलांना पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय राखीव करण्याचे ठरले आहे. यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.  

ज्यांना पहिला डोस दिला त्यांना दुसरा डोस द्यायला पाहिजे. 40 दिवस उलटून गेले, मात्र लस न दिल्याने संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी बोलणार आहे. दुसरा डोस प्राधान्याने द्यायचा विचार आहे. परदेशातील लस खरेदी करायला केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.