पिंपरी-चिंचवड महापालिकेचा क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
शहरात मुंबईच्या धर्तीवर इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा होणार
पिंपरी - शहरात आगामी सहा महिन्यात मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये देशातील 30 संघ सहभागी होणार आहेत. महानगरपालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार (खेळाडू, दिव्यांग खेळाडू व मार्गदर्शक) 2021 क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार केला आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडूंना महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी दिली.
महापालिकेच्या क्रीडा विभागाची बैठक नुकतीच महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनात झाली. त्या वेळी केंदळे बोलत होते. आयुक्त पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते. क्रीडा विभागाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन 11 ते 22 डिसेंबर या दहा दिवसाच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. शहरातील जलतरण तलाव अद्ययावत करण्यात येणार आहे. तेथे दोन वर्षांपासून स्पर्धा झालेल्या नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यात महापौर चषक स्पर्धा घेण्यात येणार आहे. क्रीडा विषयक पायाभूत सुविधा व खेळाडू घडवण्यासाठी नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे स्वतंत्र क्रीडा विभाग कार्यालय बांधण्यात येणार आहे.
कबड्डी व्यावसायिक संघ (महिला व पुरुष) तयार करण्याचे धोरण कार्यान्वित करण्यात येणार आहे. ठाणे येथील अभ्यासिकेचा अभ्यास करून आणि पाहणी अहवाल बघून स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे धोरण तयार केले जाणार आहे. व्यायामशाळा सेवाशुल्क तत्त्वावर देण्याऐवजी व्यायाम शुल्क दरात वाढ करून व्यायामशाळा पाच वर्षे भाडेकराराने चालविण्यास देण्यासाठी सि.टी.ओ. कार्यालयाच्या सहकार्याने धोरण राबविण्यात येणार आहे.
संगीत अकादमीमार्फत आमंत्रित केलेल्या नामांकित कलाकारांच्या मानधनात वाढ करून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मैदानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या मैदानावर सुरक्षा व्यवस्थेकरीता रखवालदार निवास तयार करण्यात येणार आहे. तेथे निवासी रखवालदार नियुक्त करण्याच्या सूचना केंदळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आयुक्त पाटील यांनी खेळाविषयी असलेले प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. त्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.