नागपूरमध्ये लेडी डॉनची भर रस्त्यावर हत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागपूरमध्ये लेडी डॉनची भर रस्त्यावर हत्या

नागपूर - नागपूरला शहरातील पाचपावली भागात एका लेडी डॉनचा गुंडांनी पाठलाग करून चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल अशा थरारक घटनेने नागपूर शहर हादरले आहे.

पिंकी वर्मा असे या लेडी डॉनचे नाव आहे. पाचपावली भागात एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा लोकांच्या दारात, घरात व मोहल्ल्याच्या रस्त्याने पळत होती आणि गुंड चाकू घेऊन तिच्या पाठीमागे धावत होते. तीकिंचाळत होती. मदतीची याचा करत होती, पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाही. गुंड तिच्या शरीरावर चाकूने सपासफ वार करत तिचा पाठलाग करत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून ती स्वत:च्या घरात शिरली. गुंडांनी तिथे पण तिचा पिच्छा सोडला नाही. जखमेतून निघणा-या रक्ताने ती रक्ताने भिजली, चाकूच्या वाराने तिचे कपडे फाटले व शेवटी ती खचली आणि खाली कोसळली. गुंडांनी आणखी वार केले व तेथून निघून गेले. रुग्णालयात पोहचण्याआधीच तिने प्राण सोडला.

पिंकी वर्मा अत्यंत आक्रमक होती. बोलायला वाचाळ होती. तिची स्वत:ची गँग होती. त्या जोरावर ती अवैध धंदे चालवत होती. तिच्या गँगमधल्या अनेक सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते. पिंकीची गँग दारू विक्री, जुगार भरवणे यासारख्या अवैद्य धंदे करत होती. त्यामुळे स्थानिक विरोधी टोळीच्या सदस्यांसोबत तिचे खटके उडत असे. मात्र, पिंकी ही महिला असल्याने अनेकांनी सुरवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र हळूहळू परिसरात पिंकी वर्माचा गुन्हेगारी जगतातील व्याप व दरारा वाढत चालला होता. तिची अनेक गुन्हेगारांसोबत उठबस वाढली होती. कोरोना काळात दारूची दुकाने बंद असल्याने तिचा अवैध दारूचा धंदा तेजीत होता. हे विरोधातील टोळीला पचनी पडत नव्हते. जुन्या वादाचे सूत पकडून आज दुस-या गँगने तिचा काटा काढायचे ठरवले. पिंकी नेहमी प्रमाणे आज देखील दुपारच्या वेळेस आपल्या घरासमोरील ओट्यावर मित्रांसोबत बसली होती. संधीच्या शोधत असलेल्या गुंडांची नजर तिच्यावर पडली व तिचा पळण्याची संधी न देता गुंडांनी सर्वांच्या समोर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली.

या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून, आरोपीची ओळख पटली असून पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत होती. एखाद्या चित्रपटात घडावा तसा हा घटनाक्रम होता. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.