कारमध्ये एअर प्यूरिफायर लावल्याने करोना कालावधीतील 'एअरबॉर्न व्हायरस'चा धोका होतो कमी !  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कारमध्ये एअर प्यूरिफायर लावल्याने करोना कालावधीतील 'एअरबॉर्न व्हायरस'चा धोका होतो कमी !  

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - वाहनांची वाढती संख्या, श्वास घुसमटविणारी प्रचंड ट्रॅफिक आणि वायू प्रदूषण ही शहरवासीयांना भेडसावणारी पहिली समस्या आहेच, आता करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 'एअरबॉर्न व्हायरस' म्हणजेच 'वायुजनित विषाणू' ही धोक्याची घंटा बनत चालली आहे. सार्वजनिक वाहतुकीत सामाजिक अंतराचे पालन करण्याचा प्रश्न आणि कोविड संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे. परंतु खासगी वाहन देखील धोक्यापासून मुक्त राहिले नाही. अशा परिस्थितीत, आपल्या वैयक्तिक कारमध्ये ठेवली जाऊ शकते अशी खबरदारी म्हणजे कारमध्ये 'एअर प्यूरिफायर' असणे आवश्यक आहे. 'एअरबॉर्न व्हायरस' चा धोका कमी करण्याबरोबरच कारमध्ये एअर प्यूरिफायर बसविण्याचे भरपूर फायदे आहेत. चला तर, जाणून घेऊया. 

सहसा, लांब प्रवासादरम्यान कारची खिडकी बंद ठेवली जाते. प्रदीर्घ प्रवासादरम्यान जेव्हा आपण कारच्या खिडक्या बंद ठेवत असतो तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात कारच्या आत जमा होण्याची शक्यता असते. अशावेळी एअर प्यूरिफायर केबिनची हवा साफ करते. ज्यामुळे कारमधील लोकांना श्वास घ्यायला त्रास होत नाही.

पेट्रोल-डिझेल, सीएनजी इंधनाचा दर्प  तसेच कारच्या काही भागांचा उग्र वास देखील केबिनच्या आत प्रदूषण वाढवते. जर सहकारी प्रवासी धूम्रपान करत असेल तर कारमधील हवा खूप प्रदूषित होते.  प्युरिफायर केवळ धूम्रपानाचा गंधच काढून टाकणार नाही, तर यामुळे इंधनाचा दर्पही निघून जाईल.  केबिनमधील खूप काळापासून असणारे गंध देखील ते दूर करते.

पोल्यूटेन्ट्स किंवा प्रदूषक हे द्रव स्वरूपात असू शकतात, काही घन तसेच काही वायूस्वरूपात. काही आधीच निसर्गात आहेत आणि काही मनुष्यांनी बनवलेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण  कारच्या खिडकीचा ग्लास खाली करतो तेव्हा या प्रदूषकांना कार केबिनमध्ये शिरण्याची संधी मिळते. आत आल्यानंतर, त्यांच्यामुळे होणाऱ्या ऍलर्जीने श्वसनाच्या समस्या वाढतात. एअर प्यूरिफायर हे दूषित पदार्थ काढून टाकते. याचा फायदा असा होतो की केबिनची हवा स्वच्छ होते. 

धूळ, परागकण इत्यादीमुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी वाढू शकते. आपण मुलांसह किंवा वृद्धांसह कारमध्ये प्रवास करत असताना गोष्टी अधिक खराब होऊ शकतात. जर कारमध्ये एअर प्यूरिफायर लावले असेल तर आपणास खात्री असू शकते की कारमधील हवा शुद्ध आहे आणि ऍलर्जीपासून मुक्त आहे. बर्‍याच एअर प्यूरिफायरमध्ये ऍडव्हान्सड हेपा फिल्टर असते जे कारच्या आतील हवा 99 टक्क्यांपर्यंत शुद्ध करू शकतात.

जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच प्रवास करत असाल. कदाचित त्यांच्याबरोबर प्रवास करणे आपल्याला मजेदार वाटेल, परंतु प्रत्येक वेळी आपले लाडके पाळीव प्राणी आपल्या गाडीत प्रवेश करतात तेव्हा त्यांची डेड स्किन (मृत त्वचा), फर आणि केस पडतात आणि केबिनला प्रदूषित करतात. एअर प्यूरिफायर त्यापासूनही मुक्ती देते.