चंद्रकांत पाटील तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कराच

चंद्रकांत पाटील तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल कराच

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आव्हान

कोल्हापूर, (प्रबोधन न्यूज) - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी व घरावर सीबीआयने छापेमारी केली. भाजपच्या सांगण्यावरून ही छापेमारी झाली असा मी आरोप केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. माझे त्यांना जाहीर आवाहन आहे, त्यांनी आजच्या आज हा खटला दाखल करावा, असे आव्हान आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद दिले.

मुश्रीफ म्हणाले, परमवीर सिंग या आरोपीच्या पत्रावर सुशांत सिंग राजपूत प्रकरणी काही कारवाई नाही, अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी ठोस कारवाई नाही, या सर्व प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा फेल गेल्या आहेत, असा आरोप ना. मुश्रीफ यांनी केला. परमवीर सिंग आरोप करतात, दिल्ली येथे वरिष्ठ यंत्रणांची भेट घेतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सचिव यांची रातोरात भेट घेतात, त्यानंतर लगेच एन आय ए कडे तपास जातो, याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली. यापूर्वीही अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.