३ हजार कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

३ हजार कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) : भारतीय नौदलाने हजारो कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अरबी समुद्रात मासेमारी करर्णा­या बोटीतून जवळपास तीन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नौदलाने ताब्यात घेतले आहे.

अरबी समुद्रात भारतीय नौसेनेचे जहाज सुवर्णा गस्तीवर होते. त्यावेळी अरबी समुद्रात मासेमारी करणा-या एका बोटीवर काही संशयास्पद हालचाली तेथे जाणवल्या. त्यावेळी भारतीय नौदलाच्या जवानांची या मासेमारी करणा-या बोटीची तपासणी केली. नौदलाच्या तपासणी दरम्यान यामध्ये ३०० किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांचा साठा नौदलाने जप्त केला.

केरळच्या कोची बंदराजवळ या बोटीला नेण्यात आले. या बोटीवरुन जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे ३००० कोटी आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या किमतीपेक्षा मालदीव आणि श्रीलंकेच्या दिशेना होणा-या अवैध अंमली पदार्थ्यांच्या तस्करीच्या दृष्टीने ही मोठी कारवाई आहे.