राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राहुल बजाज यांनी देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादक बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता नीरज बजाज त्यांच्या जागी कंपनीची सूत्रे हातात घेतील. नीजर सध्या कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. राहुल बजाज 30 एप्रिल 2021 पासून बजाज ऑटोचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. गुरुवारी कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

नीरज बजाज हे राहुल बजाजचे चुलत बंधू आहेत. त्यांना इंडस्ट्रीत 35 वर्षांचा अनुभव आहे. सप्टेंबर 2006 मध्ये त्यांनी बजाज ऑटोला जॉईन केले होते. 

राहुल बजाज यांनी हे पद का सोडले? 
कंपनीच्या निवेदनानुसार, 82 वर्षीय राहुल बजाज यांनी वयाचे कारण देत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक राहुल बजाज 1972 पासून बजाज ऑटो आणि गेल्या पाच दशकांपासून बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित आहेत. बोर्डाने या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर आता ते कंपनीत सल्लागार भूमिकेत असतील. राहुल बजाजची एकूण मालमत्ता सुमारे 6.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 4.8 खरब रुपये) आहे.

आता त्यांची भूमिका काय असेल ?
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच दशकांत राहुल बजाज यांनी कंपनी आणि समूहाच्या यशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कंपनीच्या हितांमधील त्यांचे अनुभव, त्यांचे ज्ञान आणि वेळोवेळी सल्लागार म्हणून त्यांची भूमिका पाहता, संचालक मंडळाने राहुल बजाज यांची 1 मे 2021 पासून कंपनीचे 'चेअरमन एमिरिटस' म्हणून नियुक्ती केली आहे. 

राहुल बजाज यांचा अभ्यास
राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. राहुल यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईच्या लॉ विद्यापीठामधून कायद्याची पदवीही घेतली आहे.

कोण आहेत नीरज बजाज ?
आता राहुल बजाज यांचे चुलत भाऊ नीरज बजाज कंपनीत अध्यक्ष म्हणून भूमिका साकारणार आहेत. नीरज बजाज 67 वर्षांचे असून या क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे. 35 वर्षांच्या कारकीर्दीत, बजाज ग्रुपच्या बहुतेक कंपन्यांमध्ये नीरज बजाज यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सप्टेंबर 2006 मध्ये ते बजाज ऑटो लिमिटेडच्या संचालक मंडळामध्ये सामील झाले. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. ते बजाज अलिअन्झ लाइफ अँड जनरल इन्शुरन्सच्या संचालक मंडळावरही आहेत.