प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - हिंदुस्थानी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतावर समान पकड असलेले प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. भाटिया हे पाच वर्ष दिल्ली विद्यापीठात संगीताचे रीडर देखील होते. श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' चित्रपटापासून फिल्मी करिअरची सुरुवात करणारे वानराज भाटिया हे जाहिरातींसाठी संगीत देणं सुरू करणारे देशातील पहिले संगीतकार ठरले.

'जाने भी दो यारों' चे संगीतकार
बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेले संगीतकार वानराज भाटिया यांनी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी अखेरचा श्वास घेतला. 'मंथन', 'भूमिका', 'जाने भी दो यारो', '36 चौरंगी लेन 'आणि 'द्रोहकाल' या चित्रपटांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाले. तथापि, त्याच्या संगीत अभ्यासाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. भाटिया यांना 1988 च्या टेलीव्हिजन रिलीज झालेल्या 'तमस' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, त्यांना 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सर्जनशील आणि प्रयोगात्मक संगीतासाठी देखील गौरविण्यात आले. 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.