धक्कादायक!  रस्त्याच्या कडेला सापडला पीपीई किट घातलेला मृतदेह !

धक्कादायक!  रस्त्याच्या कडेला सापडला पीपीई किट घातलेला मृतदेह !

पालघर, (प्रबोधन न्यूज) - महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. 

महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, घटनास्थळीच या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.