आंतरराष्ट्रीय नेमबाज 'शुटर दादी' चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन 

आंतरराष्ट्रीय नेमबाज 'शुटर दादी' चंद्रो तोमर यांचे कोरोनामुळे निधन 

नवी दिली, (प्रबोधन न्यूज) - आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्ती मिळवलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर 50 हून अधिक पदके जिंकणार्‍या बागपत येथील जौहरी गावात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

'शुटर दादी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रो तोमर यांचा आज दुपारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी त्यांना आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यामुळे गुरुवारी रात्री सात वाजता त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. 

शुटर दादीचा जन्म 1 जानेवारी 1932 रोजी शामलीच्या मखमुलपूर गावात झाला होता. तिचे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी जौहरीचे शेतकरी, बावरसिंग यांच्याशी झाले. 1998 मध्ये डॉ. राजपाल सिंह यांनी जौहरीमध्ये शूटिंग रेंज सुरू केली होती. ते चंद्रो यांची नात शेफाली तोमरला रायफल शूटिंग शिकवण्यासाठी दररोज घरोघरी येत. शेफाली शूटिंग शिकत असे आणि चंद्रो तोमर ते पाहत असत. एक दिवस चंद्रो तोमरने शेफालीकडून एअर पिस्टल घेऊन स्वतः लक्ष्य केले. चंद्रो तोमरच्या शूटिंगचा प्रवास इथून सुरु झाला.