‘अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डची लस सुरक्षितच’

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या ऑक्सफर्ड लशीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याची तीस प्रकरणे रुग्णांमध्ये सामोरी आली आहेत.

‘अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डची लस सुरक्षितच’

ब्रिटनच्या औषध नियंत्रकांचे मत

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका या कोविड प्रतिबंधक लशीच्या मात्रा १ कोटी ८१ लाख लोकांना आतापर्यंत दिल्या असून त्यात ७ जणांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही लस असुरक्षित आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही, मृतांची संख्या नगण्य तर आहेच,  त्याशिवाय या लशीमुळे हे मृत्यू झाल्याचे पुरावे नाहीत, त्यामुळे ही लस सुरक्षित असून ती घेण्याचे थांबवू नये असे मत ब्रिटनच्या औषध नियंत्रकांनी व्यक्त केले आहे.

औषध व आरोग्य उत्पादन नियंत्रक संस्थेने म्हटले आहे की, ‘यलो कार्ड’ निरीक्षणानुसार करोना विषाणू प्रतिबंधक कार्यक्रमात १ कोटी ८१ लाख लोकांना ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली असून त्यातील तीस जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे प्रकार झाले तर सात जण मरण पावले, अशी २४ मार्चपर्यंतची माहिती आहे. हीच लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केली आहे. जोखमी पेक्षा या लशीचे फायदे अधिक असल्याचे ब्रिटिश औषध नियंत्रकांचे मत आहे.

नियंत्रकांच्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही अतिशय कठोरपणे याचा आढावा घेतला असून काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, पण हे प्रमाण फारच कमी आहे. २४ मार्चपर्यंत सेरेब्रल व्हेनस सायनस थ्राम्बॉसिसची २२ प्रकरणे झाली असून ८ प्रकरणांत रक्तातील बिंबिका म्हणजे प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या.

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या ऑक्सफर्ड लशीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याची तीस प्रकरणे रुग्णांमध्ये सामोरी आली आहेत. त्याची नोंद ब्रिटनच्या औषध नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. औषध व आरोग्य नियामक संस्थेने म्हटले आहे, की रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता लशीमुळे कमी असली तरी ती काही प्रमाणात नाकारता येत नाही. तरी लोकांनी लस घेण्याचे टाळू नये. गेल्या शनिवारी २४ मार्चपर्यंत   १ कोटी ८१ लाख  जणांना लशीच्या  मात्रा देण्यात आल्या होत्या. त्यात रक्ताच्या गुठळ्यांची एकही तक्रार फायझर व बायोएनटेक यांनी तयार केलेल्या लशीबाबत आली नाही. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीबाबत अनेक देशात तक्रारी आल्या होत्या.

असून त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन रुग्णांचे बळी गेले आहेत. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी व नेदरलँड्स या देशात ही लस काही वयोगटाच्या व्यक्तींसाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. जर्मनी व कॅनडा यांनी साठीखालील व्यक्तींना ही लस घेण्यास मनाई केली आहे. काही देशात त्याबाबत वेगळ्या वयोगटात मनाई करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही ही लस वापरण्यास हरकत नसल्याचेच मत व्यक्त केले आहे.