पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पद्मविभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज (शनिवार) हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती. यंदाही त्या गाणार होत्या. मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नव्हत्या. शास्त्रीय संगीताचा वारसा जपलेल्या महान गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्रे यांनी अनेक शिष्य घडवले आहेत.

अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी हे पुण्यातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. पालक शिकवत असलेल्या शाळेतच त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे संगीत क्षेत्रातील पदार्पण हा योगायोग होता. प्रभा अत्रे या आठ वर्षांच्या असताना त्यांची आई आजारी पडली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाजवळच्या एका मित्राने त्यांना संगीतात चांगलं काम करू शकता, असे सुचवले होते. या गायनातूनच त्यांना छंद म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली.