भारतासाठी आज 'करो या मरो'

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारतासाठी आज 'करो या मरो'

दुबई -

पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्ध भारताला आज रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ साखळी लढतीत 'करा किंवा मरा' या निर्धारासह खेळावे लागेल. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेचा कस लागणाऱ्या या सामन्यात चाहत्यांची अपेक्षापूर्ती होईल का? याबाबत उत्सुकता आहे.

दहा गड्यांनी झालेला पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागणार आहे. न्यूझीलंडसारख्या उत्कृष्ट संघापुढे हे वाटते तितके सोपे नाही. टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट हे नेहमी भारतासाठी त्रासदायी ठरतात. कर्णधार केन विलियम्सन शंभर टक्के फिट नाही. मार्टिन गुप्तिलच्या पायाला दुखापत आहे. डेवोन कॉनवे मात्र आक्रमक आणि धोकादायक फलंदाज आहे. पाकविरुद्ध गोलंदाज पूर्णपणे अपयश ठरले होते.

न्यूझीलंडविरुद्ध शिथिलता चालणार नाही. पूर्णपणे फिट नसलेला हार्दिक पांड्या आणि फॉर्मशी झुंजणारा भुवनेश्वर कुमार हे संघासाठी कमकुवत सिद्ध होऊ शकतात. कंबरेच्या दुखण्यातून सावरलेला हार्दिक योगदान देण्यात अपयशी ठरत आहे. नेटवर गोलंदाजी करताना देखील तो दडपणात जाणवला. अशावेळी विजय मिळविण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीशिवाय पर्याय नाही.