रायगडावरील नाणे दरवाजाच्या पुनर्बांधणीस सुरूवात
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कोल्हापूर, (प्रबोधन न्यूज)- रायगडवाडीतून गडावर येणारा मुख्य राजमार्ग म्हणजे नाणे दरवाजा ते महादरवाजा. गडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कालांतराने दुर्लक्षित झाल्यामुळे नाणे दरवाजाचे बरेच नुकसान झाले होते. प्राधिकरणाच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दरवाजाची स्वच्छता करताना दरवाजाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेण्यात आला. यामध्ये सुमारे २०० दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यातील घडवलेले दगड ३०० ते ४०० किलो वजनाचे आहेत.
सर्व दगडांचे कमानीचे दगड, तुळ्यांचे दगड, भिंतीचे दगड असे वर्गीकरण करुन या आधारे त्यांना त्यांच्या योग्य त्या जागी पारंपरिक व ऐतिहासिक पद्धतीने बसविण्यात येणार आहे. यामुळे आपणास नाणे दरवाजाची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे व रायगड संवर्धनाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
शिवकाळात ज्याप्रमाणे नाणे दरवाजा उभा होता, त्याच प्रमाणे पुन्हा एकदा तो शिवभक्तांना पहायला मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व संवर्धन क्षेत्रातील हे एक मोठे यश असणार आहे.