दिल्लीत ऑक्सीजनअभावी डॉक्टरस आठजणांचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दिल्लीत ऑक्सीजनअभावी डॉक्टरस आठजणांचा मृत्यू

बत्रा हॉस्पीटलमधील अत्यंद दुर्देवी घटना

दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - देशात सध्या करोना संसर्गाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत कोरनाबाधित वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी रूग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचं समोर आलं आहे, येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, ”रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला.”

करोना संकट काळात दिल्लीतील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान दिल्लीतील बत्रा हॉस्टिपलकडून हे देखील सांगण्यात आले की, ”त्यांच्याकडे अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. आम्ही दररोज काही तास संकटात घालवत आहोत, हे चक्र थांबतच नाही.